देवगांव रंगारी येथे घरफोडीच्या दोन घटनांमध्ये दोन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास... परिसरात घबराटीचे वातावरण.....

0
देवगाव र./औरंगाबाद 
संतोष गंगवाल(टीम बिंदास)
  येथील शिक्षक काँलनी भागात घडलेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी दोन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.२७)पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की,दिलेली माहिती अशी की,येथील मंदिर शिल्पकार सुभाष मगर हे आपल्या कुंटुबासह शिक्षक काँलनी भागात राहतात.दरम्यान ते आपल्या कुटुंबासह घरातच झोपलेले असतांना सोमवारी पहाटे तिन ते पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जिन्याच्या दरवाजातून आत घरात प्रवेश करुन त्यांची सुन सौ.पुजा किशोर मगर यांची सोन्याचे पावणे दोन तोळ्याचे गंठन (किंमत ८०हजार रुपये) व त्यांच्या घरी आलेली पाव्हणी ज्योती गायके यांची एक लाख ३२ हजार रुपये किंमतीची चार तोळ्याचे पोत असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सकाळी उठल्यावर दरवाजा उघडा असल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.


तसेच दुसऱ्या घटनेत मगर यांच्या शेजारी राहत असलेले सुरेश मुरलीधर गायके यांच्या खिडकीतून एक बांबू टाकुन त्याच्या सहाय्याने खिळ्याला टांगलेले कपडे बाहेर ओढुन खिश्यात असलेले आठ हजार पाचशे रूपये नगदी चोरुन नेले.दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत देवगांव रंगारी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ठसे तज्ञांकडुन तपासणी करण्यात आली.
याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के.डी.दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.जी.गव्हाणे करत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top