गंगापूर/औरंगाबाद
गुलाब वाघ (टीम बिंदास)
गंगापूर तालुक्यातील शेतकर्याणी वर्षभर तुळतुळ करून ऊसाचे पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले परंतु तालुक्यात शेतकऱयांच्या हक्कचा साखर कारखाना नसल्याने नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांना शेतकर्याणी ऊस दिला परंतु नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार मराठवाड्यातील शेतकर्याना कायमच सापत्न वागणूक दिल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे कारण शेतकर्याणी आपला ऊस नगर जिल्ह्यातील साईकृपा,कुकडी,यूटेक साखर कारखान्यांना दिला होता परंतु कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही या शेतकऱयांचे ऊसाचे बिल या कारखान्यांनी थकवले आहे कित्येक महिने उलटल्यानंतरही ऐन दुष्काळात शेतकर्याना दुष्काळात तेरावा महिना आठवत आहे त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाण्याविरोधात ढोल बजाओ व ठिय्या आंदोलनासाठी आज शेतकऱयांसह वाल्मिक भाऊ शिरसाठ रवाना झाले.
जोपर्यंत शेतकऱ्याचे हक्काचे ऊसाचे थकीत बिल मिळणार नाही तोपर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा व इतर साखर कारखान्यासमोर ढोल बजाओ व ठिया आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.