दिन विशेष विनायक दामोदर सावरकर.... एक क्रांतिकारक वीर

0

"The MH bindass"

नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात सावरकरांचा २८ मे इ.स. १८८३ मध्ये जन्म झाला. सावरकर यांच्या वडीलांचे नाव दामोदरपंत सावरकर व आईचे नाव राधाबाई दामोदरपंत सावरकर असे होते. सावरकरांच्या इंच निधन ते नऊ वर्षांचे असताना ही झाली त्यांचे संगोपन त्यांच्या वहिनी येसूबाई यांनी केले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले होते. अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे  लहान पणापासून त्यांना वकृत्व, काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते. स्वतंत्रतेचे स्तोत्र स्वदेशीचा फटका या रचना त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लिहिलेला होत्या.


 त्यांचे उच्च शिक्षणासाठी ते इ.स. १९०६ साली लंडन येथे गेले होते. इ.स.१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेला उठावाचा इतिहास सावरकरांनी लिहिला होता 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ आहे. सावरकर हे फक्त मराठी कवी व लेखक नसून. भारतीय स्वतंत्र सैनिक क्रांतिकार व राजकारणी होते. सावरकर यांनी अभिनव भारत, ते अखिल भारतीय हिंदू महासभा अशा अनेक संघटनांची स्थापना केली होती. एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक व भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top