जमिर खलपे
रत्नागिरी
"The MH bindass"
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला,वाणिज्य,विज्ञान वरिष्ठ महाविदयालयाचा प्रथम वर्ष कला,वाणिज्य,विज्ञान शाखेचा निकाल ९०% पेक्षा अधिक लागला आणि विद्यापीठाने दिलेला निकाल जाहीर करण्याच्या मुदतीत निकाल जाहीर करण्यात आला
कला शाखेचा एकूण निकाल १००%असून प्रथम कु सिद्धी अरुण नार्वेकर,
वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ८६%असून प्रथम- कु सोनाली माधव शिंदे आणि
विज्ञान शाखेचा निकाल १००% असून प्रथम -कु पूजा अरुण सिनकर यांनी प्राप्त केले
या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन दि २७ मे २०१९ रोजी करण्यात आले होते यावेळी वर्गात प्रथम,द्वितीय,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री दिनकर पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी महाविदयालयाच्या प्रभारी प्राचार्या निलोफर बन्नीकोप,उपप्राचार्या प्रा मधुरा पाटील,प्रा ऋतुजा भोवड,प्रा प्रथमेश भागवत,प्रा वैभव किर,प्रा आसावरी मयेकर आदी प्राध्यापकवृंद व महाविदयालयाचे प्रथम वर्षाचे विदयार्थी उपस्थित होते
या कार्यक्रमात भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
या कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा ऋतुजा भोवड यांनी केले
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्था पदाधिकारी , प्रभारी प्राचार्या निलोफर बन्नीकोप तसेच सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले
दि ३० मे २०१९ पासून द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरु होत आहे तसेच १२ वी चा निकाल लागल्यानंतर प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरु होणार आहे तरी इच्छुक विदयार्थ्यांनी भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर कला,वाणिज्य,विज्ञान वरिष्ठ महाविदयालय रत्नागिरी द्वारा पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे