उसबील प्रकरणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम -पाचपुते

0
बाबासाहेब दांडगे 
गंगापूर/औरंगाबाद 

"The MH bindass"
गंगापूर- शेतकऱ्यांच्या ऊसाचे थकीत पेमेंट देण्यास मागील पाच महिन्यांपासून गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरणारे साखर कारखानदारांनी ढोल बजाओ तसेच ठिय्या आंदोलनाचा धसका घेत आंदोलक शेतकऱ्यांचे संपूर्ण पेमेंट शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्याची कार्यवाही आजपासूनच सुरु केली असून पुढील दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण रक्कम वर्ग करण्यात येईल अशी माहिती साईकृपा शुगर मिलचे चेअरमन विक्रम पाचपुते यांनी लेखी स्वरूपात दिली आहे.

शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी मनसेचे जिल्हा सचिव वाल्मिक शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चेअरमन पाचपुते यांच्या काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील बंगल्यासमोर ढोल बाजाओ तसेच अखंड ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज सकाळी वाल्मिक शिरसाठ यांच्यासह जवळपास सव्वाशे शेतकरी आज आंदोलन स्थळाकडे सकाळीच रवाना झाले होते.यावेळी कारखान्याचे चेअरमन विक्रम पाचपुते यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून चर्चेसाठी निमंत्रण दिले त्यानुसार आज सकाळी 11 वाजेसुमारास पाचपुते यांच्या अहमदनगर येथील बंगल्यावर शेतकऱ्यांशी बैठकीत चर्चा करून पाचपुते यांनी सहभागी सर्व 126 आंदोलक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट 29 तारखेपर्यंत तर उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट पुढील पंधरा दिवसात जमा करण्याची लेखी हमी दिल्याने आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.
दरम्यान यूटेक शुगर मिलचे चेअरमन बिरोले यांनी देखील शिरसाठ यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे थकीत संपूर्ण बिले पुढील दोन दिवसात खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले.
या आंदोलनात प्रामुख्याने भाऊसाहेब शेळके,संपत रोडगे,संजय तुपलोंढे,रामदास माने,आबेद सैय्यद, दादासाहेब गाडेकर,कल्याण धरफळे,राजू कोरडे,योगेश तारू,खलील शेख,अशोक रणपिसे,शांतीलाल पेल्हारे,नंदू शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top