जातेगाव/नाशिक
अरुण हिंगमिरे (टीम बिंदास)
नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यापारपेठ आणी उपबाजार समितीमुळे प्रसिद्ध असलेल्या बोलठाण येथे बाराही महिने तीव्र पाणी टंचाई भासत आहे. अधिग्रहित केलेले बोअरवेल पाण्याअभावी पंधरा दिवसांपूर्वी कोरडेठाक झाल्याने येथे २४ हजार लिटर क्षमतेच्या चार टॅंकरद्वारे पाणी आणून ते विहिरीत टाकले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की येथील ग्रामपंचायत मालकीचे पाणी पुरवठा करणेसाठी १० हातपंप,विहिरी चार आणी सहा बोअर आहे. पैकी चारीही विहिरी पाण्यावाचून कोरड्याठाक झाल्या असुन त्यापैकी एक विहिर भारत निर्माण योजनेअंतर्गत पाच कि.मी अंतरावर खारीखामगाव मध्यम प्रकल्प येथे खोदून तेथून सहा आणि चार ईंच पाईपलाईन करुन तेथून पाणी आनले होते. या योजनेसाठी चाळीस लाख रुपये खर्च झाला होता. सहा बोअरवेल पैकी दोन बोअर साधारण एक ते दिडतास चालतात तर ९ पैकी सहा हातपंपास गेल्या वर्षीपासून पाणीच नाही तर तीन हातपंप दिवसाच्या२४ पैकी एखादा तास चालत असल्याने येथील शेतकरी सकाहारी काकडे यांच्या शेतातील दोन बोअर अधिग्रहित करुन त्यांचे आणी ग्रामपंचायतचे एक ते दिड तास चालनार्या बोअरचे असे सर्व पाणी एकत्र करुन तेथून गावातील दिडलाख आणी पंन्नास हजार क्षमता असलेल्या दोन जलकुंभात टाकून तेथून (रोटेशन) चक्र पध्दतीने थोड्या-थोड्या प्रमाणात पंधरा दिवसांनी नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत होता.परंतू अधिग्रहित केलेले बोअरवेलच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत गेल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासु लागल्यामुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अतुल सोनवणे यांनी साधारण एक महिन्यापूर्वी येथे टॅंकरद्वारे दररोज एक लाख पंचवीस हजार लिटर पाणी पुरवठा करणेबाबत प्रस्थाव पाठविला होता. त्यानूसार रविवार दिनांक २६ पासून वैजापूर तालुक्यातील भादली येथील गळमोडी धरणातून २४ हजार लिटर क्षमतेच्या चार टॅंकरद्वारे पाणी आणून आणि परिसरातील खाजगी बोअरवेल अधिग्रहित करुन ते पाणी एकत्र करून ते ग्रामपंचायतीच्या विहीरीत टाकून तेथून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे वितरण करण्यात येणार असल्याचे येथील अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांनी सांगितले.
दरम्यान गावातील नागरिकांना पाणी टंचाई भासवू नये म्हणून आश्पाक सैय्यद, गणेश बचाटे, मलंग शाहा आणी विनोद साळवे यांचे घरगुती वापरासाठी करण्यात आलेल्या बोअरवेल अधिग्रहित करण्यात आले होते. त्यांनी ही कात टाकल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील लोकसंख्या सरासरी आठहजार असून येथे असलेल्या राष्ट्रियकृत बँक,जिल्हा बँक, पेट्रोल पंप, दोन मंगल कार्यालयात परिसरातील लहान मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, व्यापारपेठ असल्याने खरेदी साठी आणी उपबाजार समितीमुळे काही ना काही कामासाठी बाहेरगावाहून पाचशे नागरिकांचे येने जाने नेहमी सुरु असते,तर येथील कांद्याच्या पंधरा खळ्यावर बाहेरगावाहून मजुरीसाठी आलेल्या मजुरांची संख्या आठशे आहे. एकंदरीत स्थानिक आणी बाहेर गावहुण आलेल्या मजुरांसह दहाहजार नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. स्थानिक नागरिक आणी कामानिमित्त येनारे लोक, आणी मजूर यांची वाढ यामुळे पाणी पुरवठा योजनेवर आधीक भार वाढला असल्याचे ग्रामपंचायतचे मुख्य लिपीक गणेश शिंदे यांनी सांगितले*. रविवारी सकाळी दहा वाजता पाण्याचा पहिला टॅंकर आल्यावर येथील सरपंच ज्ञानेश्वर नवले यांनी चालकाचा शाॅल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.