अरुण हिंगमिरे
मनमाड/नाशिक
"The MH bindass"
मनमाडच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आले होतं. या बैठकीत पवार यांनी पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना घाम फोडला. मनमाडला तब्बल 23 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकीला मनमाडचे लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि मनमाड नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
मनमाडचे पाणी संपेपर्यंत नगरपालिका हातावर हात ठेवून का राहिले मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती का कळवली नाही? असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.पालखेड धरणात पाणीसाठा कमी असल्याने करंजवन धरणातून पालखेड धरणात पाणी सोडावे लागेल, व तेथून वागदर्डी धरणात पाणी येण्यास साधारण ६ जुनं पर्यंतचा कालावधीत लागेल. तो पर्यंत तातडीची उपाययोजना करण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा किंवा अन्य काही उपाय योजना करावी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले
"The MH bindass"
मनमाडमधील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाणीप्रश्नावरून भाजपच्या दिंडोरीच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी मनमाड नगरपालिकचे मुख्याधिकाऱी डॉ.दिलीप मेनकर यांना धारेवर धरले, तसेच काम नीट करण्याचा इशारा देखील भारती पवारांनी दिला.यावेळी आ.पंकज भुजबळ माजी नगराध्यक्ष राजा भाऊ पगारे. छोटू भाऊ पाटील. नगरसेवक अमजद भाई पठाण. आदी मान्यवर उपस्थित होते ,अख्तर शेख, राजेंद्र करकाळे, काजवे यांच्यासह आहे.भुजबळ यांचे स्विय सहाय्यक अशोक गायकवाड यांच्यासह अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.