१९७२ नंतर लोणारचे धारतीर्थ आटण्याच्या मार्गावर

0
 शिवदास सोनोने 
लोणार/बुलडाणा

"THE MH bindass"


लोणार सरोवरातील धार तीर्थाच्या गोमुखातील धार आटण्याच्या  मार्गावर प्रतिनिधी शिवदास सोनोने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या धारातीर्थ वरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे 1972 च्या दुष्काळात लोणार शहराची तहान  या एकमेव धारा तीथाने भागवली होती परिणामी यंदाचा दुष्काळ किती तीव्र आहे याची कल्पना यावी मागील सतत तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे लोणार सरोवर परिसरातील झरे ही आता आटले आहेत त्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी ही भूजल सर्वेक्षण यंत्रणेस नागपूर खंडपीठाने सूचित केले आहे .



मुळात या भागात आता भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालवली आहे त्याचे परिणाम दृष्ट स्वरूपात दिसू लागले आहेत त्याचा परिणाम कधीकाळी अखंडपणे वाहत असलेल्या या धारेवर ही झाला आहे धारातीर्थ वरील  गोमुखात पडणारी धार ही 1972 च्या दुष्काळात आटली होती त्यानंतर पुन्हा आता तशी स्थिती उद्भवत आहे परिसरातील भूजल पातळी घटल्याने सरोवर परिसरातील हिरवळी आता दृष्टिपथास  य़ेत नाही दरम्यान याचा फटका पर्यटनालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही धारातीर्थ बरोबरच लिंबी बारवेतही पाणी नाही दुसरीकडे लोणार शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या बोरखेडी प्रकल्पातही आता ठणठणात  दिसून येत आहे लोणार शहराला एक महिन्या आड आता पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे अशा स्थितीत या धारेचा होणार  लाभ किती पत होईल याबाबत शंकाच आहे  चार वर्षांपूर्वी गोमुखात पाणी कोठून येते  याचा पुरात्व विभागाच्या एका पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी आतील बाजूने जमिनीखालून एका दगडी दांडा द्वारे सुबक पद्धतीने गोमुखा पर्यंत पाणी आणल्या गेल्याचे समोर आले होते त्यामुळे गोमूखात येणाऱ्या पाण्याचा स्त्रोतच आता आटला की काय अशी भीती व्यक्त होतंय

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top