देवगाव- बोरगाव रस्त्याला मुहूर्त कधी मिळणार?

0
बाबासाहेब दांडगे
टिम बिंदास अपडेट/औरंगाबाद



गल्लेबोरगाव- ते देवगाव रंगारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या बारा किलोमीटर च्या रस्त्यावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते झाले आहे. 

या रस्त्या दुरूस्तीचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या रस्त्यावर काही दिवसांनी देवगाव ते देवळाणा या ठिकाणी कामासाठी खडी व कच आलेली आहे परंतु काम काही सूरू होत नसल्याने या मार्गाने प्रवास करणारे छोटे मोठे वाहनचालक परेशान झाले आहेत.
रस्त्या दुरूस्तीचे उद्घाटन झाले कामासाठी मटेरिअल सुध्दा आले असताना काम का सुरू होत नाही. कामास कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न गल्लेबोरगाव, देवळाणा व देवगाव ग्रामस्थासह प्रवाशांना पडला आहे.
लवकर काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top