संतोष गंगवाल
देवगांव रंगारी-औरंगाबाद:
देवगांव रंगारी-औरंगाबाद:
देवगांव रंगारी (ता.कन्नड) येथे हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या तरूण कामगाराने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.तीन) सकाळी घडली. बाळु शेकु वाहटुळे (वय २१)असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत ठाणे अंमलदार खुळे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,
बाळु वाहटुळे (वय २१, रा. डोंगरगाव, ता.फुलंब्री) हा येथील वैजापूर रस्त्यावरील हाॅटेल साई माऊलीत वेटरचे काम करत असे. सोमवारी सकाळी शौचास चाललो असे सांगुन तो हाॅटेलमागे असलेल्या शेतात गेला. बराच वेळ झाल्यावर त्याचा शोध घेतला असता तो लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळुन आला. बीट जमादार गव्हाणे व मनोज लिंगायत यांनी घटनास्थळी भेट . या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.