दुष्काळ निवारणासाठी दुवा...

0
धनंजय माने
बीड

 महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर बुधवारी देवडी शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील प्रमुख तीन ठिकाणच्या सर्व मशिदी व सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही. काल मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून  बुधवारी रमजाई ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते़ . सकाळी ९ ते १0 पर्यंत सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.
देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. यानंतर गोरगरीब, अनाथ, भिक्षूक, फकीर, साधूंना दानधर्म करण्यात आला. ऐपतदार कुटुंबीयांनी वार्षिक उत्पन्नातील ठराविक हिस्सा (जकात) गोरगरिबांना दिला.
ईदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्या च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top