दोन मजूरांच्या झोपडीला आग-आगीच्या लोळात प्रपंचाची राख

0
सौरभ लाखे
शिऊर|औरंगाबाद

शिऊर :येथील  मजुरी  करणाऱ्या दोन मजूराच्या  राहत्या झोपडीला सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लागलेल्या  आगीत संपूर्ण  संसारोपयोगी साहित्य व काहीरोख रक्कम जळून खाक झाली. या आगीत साधारणत साठ हजाराचे रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे  जिवीतहानी टळली .


या घटनेची अधिक माहिती अशी, शिऊर येथील नंदू भाऊसाहेब सोनवणे व केशव खंडू सोनवणे हे मजूरी करून आपली उपजिविका भागवितात. रात्री आपल्या कुटूंबासोबत झोपडी बाहेर झोपले असताना  त्यांना आपल्या घराला आग लागल्याची जाणीव झाली.  संपूर्ण कुटुंबाने आरडाओरड केल्याने गावातील लोक मदतीसाठी सरसावले व आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. 
यावेळी लागलेल्या भीषण आगीमुळे घरातील संसार उपयोगी साहित्य धान्य कडधान्य संपूर्ण  संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. नंदू भाऊसाहेब सोनवणे यांचा सत्तावीस हजार तर केशव खंडू सोनवणे 31 हजार चारशे रुपयाचे असे एकूण जवळपास साठ हजार  रूपयाचे नुकसान झाले आहे .असे शिऊर चे तलाठी के.आर.कोसे व पोलीस पाटील सुनील देशमुख यांनी पंचनामा करून माहिती दिली कुटुंब घराबाहेर झोपले असल्याने  सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top