पावसामुळे शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -- आ.कांदे

0
अरूण हिंगमीरे
नांदगाव,नाशिक


नांदगाव तालुक्यात ऑक्टोबर महिना संपत आला तरी परतीच्या पावसाने दररोज थैमान घातल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांचे काढणीस आलेले मका कपाशी बाजरी आणि इतर धान्य कडधान्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात  करावी यासाठी तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तहसीलदार मनोज देशमुख गट विकास अधिकारी जी.पी. चौधरी तालुका कृषी अधिकारी जे. आर. पाटील यांच्यासह तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व कर्मचारी महसूल विभागाचे सर्व कर्मचारी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.


बैठकीस मार्गदर्शन करताना आमदार कांदे म्हणाले की मी व आपल्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार भारतीताई पवार आणि अधिकारी वर्गाने तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी शेतात परतीच्या पावसामुळे झालेले पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली तालुक्यातील सफेद सोने म्हणून ओळख असलेल्या नगदी पीक कपाशीचे त्याचप्रमाणे मका,सोयाबीन, कांदे लागवडीसाठी तयार करण्यात आलेले रोप तसेच बाजरी आणि इतर धान्य कडधान्य काढणीस आलेल्या पिकांची पावसात भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकरी बांधवास खरीब पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सुमारे ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आलेले आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या प्रत्यक्ष


शेतात जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ज्या शेतकरी बांधवांनी पिक विमा घेतला असेल अशा विमा धारकांचे स्वतंत्र पंचनामे करावे तसेच ज्यांनी पिक विमा घेतलेले नसतील अशा शेतकरी बांधवांसाठी स्वतंत्र शासनाची मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे तयार करण्यात यावे यासाठी तालुक्यातील 88 ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या 100 गावातील शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे पंचनामे तातडीने सुरु करण्यासाठी कृषी विभागाचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महसूल विभागाचे कामगार तलाठी यांना तातडीने आदेश जारी करून आठ दिवसाच्या वरील काम पूर्ण करावे जेणेकरून तालुक्यातील बळीराजाला योग्य वेळेमध्ये त्याची नुकसान भरपाई मिळाली तर त्यांची नियोजित कामे तसेच रब्बी हंगामासाठी मदत होईल वरील कामात कुठल्याही अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची काही केल्या जाणार नाही आपणास मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास आम्हाला सांगा आम्ही स्वतः आमच्या कार्यकर्त्यांच्या समवेत मदत करण्यास तयार आहोत असेच त्यांनी ठणकावून सांगितले यावेळी तालुक्यातील सुमारे 600 पेक्षा अधिक शेतकरी आणि प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप सुर्यवंशी हे उपस्थित होते ठरलेल्या कार्यक्रमानुसार आज दिनांक 31 ऑक्टोबर पासून तालुक्यातील ठिकठिकाणी शेतात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यासाठी कामगार तलाठी कृषी विभागाचे कर्मचारी आणि ग्रामसेवक यांना दिलेल्या ठिकाणी व गावात जावून शेतकरी बांधवांच्या भेट घेऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामा करण्यासाठी रवाना झाले असल्याचे समजते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top