मुख्यमंत्र्याच्या सभेआधी धक्कादायक घटना,'पुन्हा आणुया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

0


शिवदास सोनोने
बिंदास प्रतिनिधी
बुलढाणा, शेगांव

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुन्हा आणूया आपले सरकार असी भाजपची टी-शर्ट अंगात घालून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.

        राज्यात विधानसभेचं वारे आहेत.अशात आश्वासनांच्या टोपलीत शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा असताना थेट प्रचारादरम्यानच शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
       तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे पुढच्या काही वेळातच जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.

कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड इथली सकाळी 11 वाजताची घटना आहे. 35 वर्षीय राजू ज्ञानदेव तलवारे असं मृतकाचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी यवेल्यामध्येही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्यानेळ शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top