बिंदास प्रतिनिधी-
अरुण हिंगमीरे
नांदगाव (नाशिक)
१६-ऑक्टोंबर रोजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महा आघाडीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव येथे शिव संस्कृती मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलताना महागडी चे स्टार प्रचारक अमोल मिटकरी म्हणाले की, युती सरकारने शरद पवारांना संपवण्याचा डाव रचला असून या सरकारचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही या राज्यातील जनता आमच्या बरोबर असल्याने २१ तारखेनंतर या राज्याचा मुख्यमंत्री – गृहमंत्री राष्ट्रावादीचाच राहणार आहे. शिवसेनेची सध्या मोठी फरफट चालू असून वाघाची शेळी झाल्याने त्यांना आता खाली वाकल्या शिवाय गत्यंतर नाही अशी खरमरीत टीका अमोल मिटकरी यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महाआघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमदेवार आ. पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथिल शिवस्फूर्ती मैदानावर आयोजित केलेल्या सभे प्रसंगी केली या वेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार कोंडाजी आव्हाड, आ. पंकज भुजबळ, माजी आ. अनिल आहेर, माजी आ. संजय पवार, माजी खासदार समीर भुजबळ, मालेगावचे राजेंद्र भोसले, नंदाताई मथुरे, तालुका अध्यक्ष विजय पाटील शहर अध्यक्ष बाळकाका कलंत्री मनमाडचे माजी नगर अध्यक्ष योगेश पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी अमोल मिटकरी म्हणाले की नांदगावच्या या भूमीत गाडगेबाबांनी याच मैदानातून जनतेला प्रबोधन केले होते. मागील वर्षी १० एप्रिल २०१४ ला येथे आलो होतो तेव्हा महाराष्ट्रात गुंडांच सरकार आणू नका या सरकारने अजिबात लोक विकासाची कामे केली नाहीत २०१४ ला त्याच्या जाहीरनाम्यात डीझेल पेट्रोल कमी होतील बरोजगारांना रोजगार दिले जाईल यासह आश्वासनांची मोठी यादी होती मात्र त्यांनी येथे हुकुमशाही सुरु केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे यांना तर अजिबात संवेदनशीलता नाही महाराष्ट्रात पूरपरीस्थिती निर्माण झाली तेव्हा हेच उद्धव ठाकरे कोठे गेले होते असा सवाल मिटकरी यांनी केला या पूर्वग्रस्तांच्या मदतीला तेव्हा शरद पवार व जयंत पाटील व राष्ट्रवादी धावले. आर. आर. पाटील गृहमंत्री असंताना १२ हजार पोलिसांची भरती झाली या सरकारच्या काळात बेरोजगारी निर्माण झाली. १० रुपयात थाळी ऐवजी या सरकारने शिक्षण द्यावे.
इथला शेतकरी कष्टकरी आहे तो कष्टकरून खाऊ शकतो त्याच्या मुलांना १० रुपयात शिक्षण द्या. शेतकऱ्यांना कांदा, कापाशी, तूर या पिकाला भाव द्या लोक भाव मांगायला गेले तर त्यांना साले म्हणतात अश्या साल्यांनाच म्हणजेच त्याच्या पुत्रांना निवडणूकीत तिकीट देतात, पोरी पळवनाऱ्याची भाषा करण्याऱ्या रामकदमांना तिकीट देतात. म्हणजे गुंडपुंडाना हे सरकार पाठीशी घालत आहे. अमित शाहा तर सर्वात मोठे गुंड आहे. ते पवार साहेबाना म्हणतात तुम्ही काय केले? त्या अमित शाह ला म्हणा गुजरात बघ. देशात पहिली कर्ज माफी दिली ती संत तुकाराम महाराजांची दिली ती दुसरी कर्ज माफी दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी तर तिसरी कर्ज माफी दिली ती शरद पवारांनी आणि आगामी काळात कॉंग्रेस राष्ट्रावादीचे सरकार येणार आहे. तेव्हाही आमचा जाहीरनाम्यातला पहिला मुद्दा असेल शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ हे सरकार कोणताही विकास करून शकले नाही शिवस्मारकाचे काय झाले. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच स्मारक नाही करू शकले डॉ. बाबासाहेबांचे स्मारक नाही करू शकले त्यामुळे या सरकारला त्यांची जागा दाखवा असे आवाहन करतांना लोकसभेच्या वेळेस जे झाले ती वेळ आता राहिली नाही संपूर्ण राज्याचे वातावरन आता बदललेले आहे आगामी काळात या राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार येणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या शिवस्फूर्ती मैदानावरून विचारांचीस्फूर्ती घेत राष्ट्रवादीचे आ. पंकज भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ही अमोल मिटकरी यांनी केले.
प्रदेशअध्यक्ष जयंतपाटील म्हणाले की या भाजपसरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अगदीतुटपुंजी कर्जमाफी दिली सरकारची नोट बंदी फसली त्यामुळे त्यांचा परिणाम उद्योग व्यवसायावर झाला अनेक उद्योग बंद पडले आणि येथील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली ७० टक्के कामगार बेकार झाले हे सरकार भ्रष्टाचारी आहे अनेकांना क्लीनचीट दिली देवेंद्र फडणवीस रबर स्टम्प आहे अश्या थापाड्या सरकारला सत्तेवून दूर करण्याची वेळ हीच आहे. या मतदार संघाचे आ.पंकज भुजबळ एक सालस आणि सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व असून त्यांना या निवडूनकीत विजयी करावे असे जयंत पाटील यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की नांदगावला सर्व विकासकामांना प्राध्यान्य देतांना मनमाडला पाणी आणले. नांदगावला ही आणले पण येतील वितरण व्यवस्था बरोबर नाही देवसाने ते कातरणी पर्यंत १७५ किमीचा कालवा केला येवल्याला पाणी नेले मनमाड ला पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करील झाली एरंडगांव चे पाणी नाग्यासग्या आणून करंजवनचे मनमाड ला आणून नांदगावला शिवसृष्टी मनमाड ला भीमसृष्टी निर्माण करून. वेहळगांव वन पर्यटन क्षेत्र तसेच तरुणांसाठी अकॅडमी सुरु करू. इथला तो विरोधी उमदेवार संजय पवारांना धमक्या देत आहे त्याला म्हणा तुही लक्ष्यात ठेव “मै भी उसी तालाब की मछली हु” मी ही शिवसेनेतून आलो आहे असेही भुजबळ म्हणताच एकच हास्या पिकला तु जे रात्रदिवस काम करतो आहे ते पोलीस यांचे कडे नोंद आहे एकीकडे भाऊ दुसरीकडे दादा उभा आहे तुम्हाला भाऊ हवा कीदादा यावर सभेतून भाऊ हवाच उत्तर आले. विषाची परीक्षा पाहू नका येथे अशांतता नांदेल तेव्हा वेळ हातातून गेली असेल आपण सर्वांनी भाऊ हवाआहे म्हणून आ. पंकज भुजबळ यांच्या घड्याळ निशानिसामोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन ही छगन भुजबळ यांनी केले शिवस्फूर्ती मैदानावर प्रचंड जनसमुदाय जमला होता या पूर्वी ही कधीही अशी सभा झाली नाही. एवढी विराट सभा होती या सभेचे प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले तर सुत्र संचालन भास्कर कदम यांनी केले.