सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे मतदान जनजागृती रॅली

0
बिंदास प्रतिनिधि
समाधान घुले
सोयगाव ,औरंगाबाद

सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे मतदान जनजागृती रॅली सुशील मुरली माध्यमीक व व उच्च माध्यमिक विद्यालयात तर्फे मोठ्या उत्साहात पावसामध्ये मतदान करा लोकशाही टिकवा याच संदेशाने रॅली काढण्यात आली.


दिनांक 19 ऑक्टोबर 2019 शनिवारी दहा वाजता माध्यमिक शाळा गोंदेगाव यांच्यावतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती शिक्षित अशिक्षित खेड्यातील पाड्यातील लोकांपर्यंत आपल्या मताचा अधिकार समजावा आपले अमूल्य बहुमत वाया जाऊ नये म्हणून " चला मतदान करू या जातीवर ना धर्मावर मत करू कर्मा वर चा नारा देत लोकशाही बळकट करून
आपला प्रतिनिधी निवडून आणू या आपले शैक्षणिक कामाची समस्या सोडवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी नागरिकांनी आपल्या मताचा हक्क बजवावा संविधान लोकशाही टिकावी या उद्देशाने शाळेच्या वतीने भर पावसात विद्यार्थी रॅली काढण्यात आली होती या संगीत विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी सह गावकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top