मनमाड - करंजवन २९७ करोड रु.ची पाणी योजना मंजूर करुन दाखवली- रत्नकर पवार"

0


बिंदास प्रतिनिधी
अरुण हिंगमीरे
 नांदगाव (नाशिक)

 मनमाड शहरासह संपुर्ण नांदगाव मतदारसंघातील जनतेचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मी पाठपुरावा करून व सौ.मनीषा रत्नाकर पवार (अर्थ व बांधकाम सभापती, नासिक जि. प.) यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासना कडून २९७ करोड रु. ची मनमाड - करंजवन पाणी योजना मंजूर करून घेतल्याने मनमाड शहरातील जनतेस व संपूर्ण नांदगाव मतदारसंघातील नागरिकांना गेल्या ४0 ते ५0 वर्षांचा भेडसावणारी  पाणी समस्या कायमची सोडवली जाईल अशी माहिती नांदगांव मतदारसंघातील विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रत्नाकर पवार यांनी दिली.
   रत्नाकर पवार यांनी  उच्च शिक्षण घेतले असून  (बी.ई. सिव्हिल) व्यवसायाने ते इंजिनिअर आहेत त्यामुळे शासन दरबारी कायम जनतेच्या निगडित समस्या कायम सोडवत असतात.

आजवर अनेक आमदार जनतेने निवडून दिलेत, अनेक वर्षे सत्ताधारी आमदार असताना सुद्धा नांदगाव मतदारसंघा सह संपूर्ण मनमाड वासियांचा पाणी प्रश्न कोणीही सोडविला नाही त्यामुळे मतदार संघातील अनेक विकास कामांना खीळ बसला असून जनतेने ह्या वेळेला मला प्रचंड मतांनी निवडून दिल्यास  मी कायम साठी पाणी समस्या सोडवून देऊन नांदगाव मतदारसंघ सुजलाम-सुफलाम करून दाखवीन अशी ग्वाही  देत असून मी सत्तेवर नसतानाहीं मनमाड
- करंजवन२९७ करोड रुपयाची  पाणी योजना मंजूर करून आणली तसेच ५६ गाव पाणी पुरवठा 100 करोड रु.मंजूर केली,माणिकपुंज धरणा साठी ५० करोड रु.मंजुरी देण्यात आली असून गिरणा उजवा कालवा ५० करोड रु.चा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून ह्या कामी मी सातत्याने पाठपुरावा करणारच असून नांदगाव विधान सभा मतदार संघातील मतदारांनी माझ्या शिट्टी निशाणी समोरील बटण दाबून  मला भरभरून मत देऊन निवडून द्यावे नांदगाव मतदारसंघा चा काया पालट केल्या शिवाय राहणार नाही भविष्यात कसल्याही समस्यांचा आपणास भेडसावणार नाहीत मी शेतकरी कुटुंबातील च असून गोर गरीबाच्या अडचणी अगदी जवळू माहिती असल्या मुळे मी निवडून आल्यास आमदार म्हणून नव्हे तर  जनतेचा सेवक म्हणून काम करीत व संपुर्ण मनमाड सह नांदगाव तालुका समस्या मुक्त करून जनतेस शासनाच्या विविध योजना राबवून मनमाड - नांदगाव मतदारसंघ हरित मतदार संघ करून दाखविन असे आवाहनही रत्नाकर पवार यांनी या वेळी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top