नाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0
अरूण हिंगमिरे
नाशिक


संपूर्ण नाशिक जिल्ह्यात घोटी इगतपुरी पेठ, सुरगाणा, सटाणा, कळवण, येवला, सिन्नर त्र्यंबकेश्वर चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव देवळा, दिंडोरी व निफाड  इत्यादी तालुक्यांमध्ये पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर परतीच्या पावसाने कहर केल्याने जिल्ह्यातील द्राक्ष बाग त्याचप्रमाणे इतर फळबागा तसेच भात नागली वरई, कपाशी, मका, तुर बाजरी, आणि इतर काढणीस आलेले कडधान्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

 जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कुठरे येथील शेतकरी आत्महत्याची घटना ताजी असतानाच आज रोझे या गावातील वैफल्यग्रस्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे भास्कर रामा घुगे वय 66 या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जिवण यात्रा संपली आहे. घुगे यांच्या कपाशी, मका, कांदा या पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाल्याने बँकेचे कर्ज कसे परत फेड करावी आणि घर खर्च कसा करावा या नैराश्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समजते. 

शेतकरी बांधवांची पावसाळ्यातील खरिपातील हंगामाच्या पिकावर पुढील रब्बी हंगामाचे नियोजन असते.  यंदा पावसाळा चांगला झाल्याने पीकही जोमदार होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने उभ्या पिकाची नासाडी झाली आहे बाजरीच्या तसेच मकाच्या पिकास ओले झाल्याने कोम फुटले आहे.

 मागील वर्षी कोरडा दुष्काळ व आता अस्मानी संकट समोर आल्याने शेतकरी बांधवांस ओल्या दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांचे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करत असतांना जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तर जिल्ह्यातील बागलाण पट्यातील नुकसान ग्रस्त पिकांची पहाणी साठी गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाष भामरे यांच्याकडे नुकसानीची व्यथा मांडतांना शेतकर्यास आश्रु अनावर झाले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top