काळजी करु नका मी आलोय तुमच्या मदतीला-- शरद पवार

0
अरूण हिंगमीरे 
घोटी,नाशिक

ऑक्टोबर महिना संपूर्ण नोव्हेंबर महिना चालू झाला तरी परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात जोडप्याचे काम चालू केले जिल्ह्यातील बात पिकांसह द्राक्ष बाग कपाशी, मका, तुर, सोयाबीन यासह काढणीस आलेल्या सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेआहे.  विधानसभेची निवडणूक झाली  महाराष्ट्रातील जनतेने केलेल्या मतदानात विधानसभेची त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेले चित्र निर्माण झाले आहे.  सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षांना सरकार स्थापन करण्यात येईल ईतके बहूमत असतांना देखील मुख्यमंत्री पद आणि खाते वाटप याचा तीढा सुटता सुटेना अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात झालेल्या

अवकाळी पावसाच्या माऱ्यात सापडलेल्या भात पिकांची इगतपुरी तालुक्यातील टाकेद– घोटी शिवारातील शेतकऱ्यांच्या भात लागवड केलेल्या शेताची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज केली.


शेतकरी महिलांनी अवकाळी सह सुलतानी माऱ्याने शेतकरी हैराण झाल्याचे सांगताच मी आलोय काळजी करू नका शेतकरी बांधवांनो तुमच्या हितासाठी रात्रीचा दिवस न थकता सुरू आहे,तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सेना सत्तेत मुशगील असल्याचा टोल लगावत मी
बळीराजाला आधार देण्यासाठी फिरत आहे. असे सांगत जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येईल असही  पवार  यांनी सांगितले.माझे पदाधिकारी कायम तुमच्या सेवेत राहतील काळजी करू नका असे आश्वासनही शरद पवार यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना दिले.

 यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुधीर तांबे, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड संदीप गुळवे, संपत सकाळे, गोरख बोडके, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अर्चना भाकड-पागेरे, उदय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब गाढवे, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष रामदास धांडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top