स्ञोत-प्रतिनिधी
जातेगाव, नाशिक
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक व नाशिक ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल संजय बंशीलाल जोनवाल यांच्या पत्नी आशाताई जोनवाल यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराशी झुंज देत असतांना नाशिक येथील त्यांच्या रहाते घरी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे, दिर,भाया, दोन जाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर जातेगाव, ता नांदगाव येथे शोकाकुल वातावरणात बुधवारी सकाळी दहा वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांचा उत्तर कार्याचा कार्यक्रम दि.२४ नोव्हेंबर रोजी जातेगाव येथे करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.