नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील माजी सरपंच अशोक जाधव यांचे वडील तुळशीराम लक्ष्मण जाधव यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दपकालाने सोमवार दि. १८ रोजी सकाळी ८.३० वाजता निधन झाले आहे.
त्यांच्यावर येथील अमरधाम मध्ये सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दहा मुले, सुना, नातवंडे, असा परिवार असून त्यांचा उत्तरकार्याचा कार्यक्रम पाचव्या दिवशी दि.२२ रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले आहे.