अरुण हिंगमीरे
नांदगाव,नाशिक
मुक्तानंदगिरि बापू महाराज हे ब्रम्हर्षि संत जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांचे शिष्य असून ते आंतरराष्ट्रीय कथाकार आहे, त्यांचे चाळीसगाव तालुक्यातील जुनपाणी येथे तसेच येवला तालुक्यातील नायगव्हान येथे आणि कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथे आश्रम आहे.
वरील ठिकाणी त्यांच्या गोशाळा असून त्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये 500 गाईंचे स्वखर्चाने पालन पोषण केले आहे.
त्यांची सनातन धर्म परिषदेच्या महाराष्ट्र संघटनमत्री म्हणून निवड झाल्याचे समजताच महाराष्ट्रासह देशातील साधु महंतांनी व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी शुभेच्छांंचा वर्षाव करुन मुक्तानंद गिरि बापू यांचे अभिनंदन केले.
नांदगाव,नाशिक
महामंडलेश्वर स्वामी मुक्तानंद गिरि बापू महाराज यांची दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सनातन धर्म परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारिणी संरक्षक श्री आत्मानंदयोगीजी महाराज, श्री विष्णू दास जी महाराज, श्री अवधबिहारी दास जी महाराज, श्री अवधेश दास जी महाराज व परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या सनातन धर्म परिषदेच्या संघटनमत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली.