चारित्र्याचा संशय घेऊन मंगळाणे येथे पत्नीचा खुन

0


बिंदास  प्रतिनिधी-अरुण हिंगमीरे 
नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील मंगळाणे येथे सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी आशाबाई विजय आहिरे ( वय ३०) यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन पती विजय वसंत आहिरे याने ऊसतोड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याने गळ्यावर दोन घाव घातल्याने आशाबाई ह्या गंभिर जखमी झाल्याने रक्तस्राव झाल्याने मयत झाल्या.

याबाबत आशाबाई यांचे वडील संजय रंगणाथ पवार रा. डोणडिगर ता. चाळीसगाव यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव व उप पोलीस अधीक्षक समिर सिंह साळवे मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगावचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तातडीने वरील ठिकाणी जाऊन आरोपी विजय आहिरे यांस ताब्यात घेतले असून भा.द.वी.कलम ३०२ अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर २५४/२०१९ नोंदवला असून  पुढील तपास पोलीस हवालदार रमेश पवार, पोलीस नाईक भरत कांदळकर, पोलीस काँन्सेबल पंकज देवकाते, सागर कुमावत, नामदेव गांगुर्डे, वाघ हे करत असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top