निधनवार्ता- श्री लक्ष्मण तारू राठोड

0
लक्ष्मण तारु राठोड यांचे निधन

कार्यालयीन अधीक्षक ,ग्रामीण रुग्णालय -बदलापूर जि ठाणे,,हल्ली मुक्काम-नेरळ ता कर्जतयांचे आज रविवारी दि 17रोजी दुपारी 3:00 वाजता अल्पशा आजाराने उपचारादरम्यान KEM हॉस्पिटल मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे. ते अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे होते,आरोग्य विभागात एक मोठं नाव .


कित्त्येक तरुणांना आपल्यासोबत घेऊन जाऊन त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करून सर्वांचे संसार उभा करणारा निस्वार्थी अवलिया आज आम्हा सर्वांच्या जीवाला चटका लावून सोडून गेला मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या कायम पाठीमागे राहनारा,सर्व मित्र,भाऊ, भाचे ,पुतणे यांचा मार्गदर्शक आज हरपला, अशी प्रतिक्रिया माजी उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात 5 भाऊ,2 बहिणी, 2 मुले ,1 मुलगी व पत्नी असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी जातेगाव ( वसंतनगर) ता नांदगाव  येथे उद्या दि 18.11.2019 रोजी सकाळी 10 वाजता होईल, असे जातेगाव येथील त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top