नविन कसारा घाटात पुन्हा ब्रेक फेल ची पुनरावृत्ती बसचालकाच्या प्रसंग अवधनाने अनर्थ टळला ...

0
अरूण हिंगमीरे 
इगतपुरी नाशिक

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ब्रेक फेलची पुनरावृत्ती परंतु वाहान चालकाच्या प्रसंग अनवधानाने तल्लख बुद्धीने आनेकांचे वाचले प्राण.

आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास नविन कसारा घाटात अपघात रॅम्प जवळ थोड्याच अंतरावर  नाशिक वरुन मुंबईला जानारी MH 20.BT2061 या क्रमांकाची   महामंडळाच्या एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाले 


हे बस चालकाच्या लक्षात येताच त्याने ब्रेकफेल गाड्यां साठी बनवण्यात आलेल्या रॅम्प कडे वळवली व लागलीच बस त्या ठिकाणी आडकली त्या मुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला या वेळी महामार्ग वाहतूक शाखेचे

 (घोटी टॅप )चे पोलिस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन एस.टी बस मधिल प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले व सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहानान मध्ये रवाना करण्यात आले व प्रवाशांनी देवदुता सारखे धाऊन आल्या बद्दल पोलिसांचे आभार मानले.


दरम्यान या प्रसंगी ए.एस.आय.संजय हिरे,माधव पवार,योगेश पाटील,राहुल गांगुर्डे,अक्षय नाठे,केतन कापसे,किरण आहेर, राहुल सहाने,श्रिराम वारुंगसे,सुदाम सावकार या पोलिस कर्मचाऱ्यांनी मदत केली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top