आमोदे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
अरुण हिंगमीरे 
नांदगाव (नाशिक)

  नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील शेतमजुरी करणारा  धनराज रामदास पवार वय (वर्षे ४२) याने दारूच्या नशेत व  नैराशेतून आमोदे -  बोराळे  रस्त्यावर गावापासून काही अंतरावर असलेल्या कडुलिबाच्या झाडाला दोरी लावून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. 

            मयत धनराज पवार रविवारी सकाळपासूनच कोणाला घरात काही न सांगताच घराबाहेर निघून गेला होता संध्याकाळी तो घरी परत न आल्याने नातेवाइकांकडून त्याची शोधाशोध सुरू होती मात्र तो मिळून आला नाही. सोमवारी सकाळी मात्र बोराळे रस्त्यावरील अमोदे शिवारात एका कडुलिबाच्या झाडाला गळफास घेत असलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला काही ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर आमोदे येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान पगार यांना दूरध्वनी द्वारे  कळवण्यात आल्याने त्यांनी नांदगाव पोलिसाना दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिल्याने नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून शेव विच्छेदनासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मयत धनराज पवार यांच्यावर  आमोदे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,
           रविवारी त्यांचे वडील मयत नामे रामदास श्रीपत पवार यांचा वर्षीच्या कार्यक्रम असून देखील त्याने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती संध्याकाळी घरी परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो कुठेच आढळून आला नाही सकाळी मात्र सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह एका कडुलिबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता त्याच्या पश्चात पत्नी संगीता,  मुलगी सपना (वय २०)   मुलगा शुभम ( वय १७ ) असा परिवार आहे,

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top