नोटबंदीवर बोलू काही-बोलके शब्द

0


अरूण हिंगमीरे

बिंदास न्यूज नेटवर्क

8 नोव्हेंबर 2016 ही तारीख आणि दिवस भारतातील प्रत्येक नागरिक कधीही विसरणार नाही. अंगावर शहारे आणणारा व झोप उडवणारा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान घेतला होता. काळे धन यावर नियंत्रण मिळवणे या निर्णयाचा उद्देश होता त्यामध्ये नियंत्रण झाले आहे का ?

नोटबंदीचा उद्देश साध्य झाला का हे प्रश्न आजपर्यंत प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. जूने 500, 1000 हजाराची नोटांची एका सेकंदात रद्दी झाली हा निर्णय चटका देवून जाणारा होता. देशभर बँकासमोर नोटा बदलण्यासाठी लागलेली लाईन, त्यासाठी तासणतास प्रतिक्षा करावी लागली शेकडो लोकांचे प्राण, हे देखील विसरता येणार नाही. नवीन दोन हजार व पाचशेची छोटी नोट हातात पडली त्यानंतर व्यवहार सुरळीत होण्यासाठी सर्वांनाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या दरम्यान काळ्या धनावर नियंत्रण मिळवल्याचा सरकार कडून दावा केला जात आहे.




विविध एप च्या आधारे ऑनलाइन व्यवहार वाढले ,पण त्यामधूनही फसवेगिरीचे प्रकार वाढले आहेत. नोटबंदीची चार वर्षे ही तारीख येवून ठेपली आहे. सरकारने नवीन पाचशेची नोट, दोन हजाराची नोट, शंभरची नोट व कॉईन, 125 रुपयाचे कॉईन, दोनशेची नोट व विविध नोटांचे नवीन चलन काढले आहे. ऑनलाइन पेमेंट वर नागरिक जास्त भर देत आहे. खाजगी कंपन्या सुध्दा ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. चार वर्षात फार काही बदल आर्थिक देवान घेवानित दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात नगदी व्यवहार होतांना दिसत नसले तरी आजुनही ग्रामीण भागात खाजगी सावकारी सुरुच असल्याचे पहावयास मिळत आहे. रियल इस्टेटवर काही प्रमाणात नोटबंदीचा परिणाम झाल्याचे चित्र मध्यंतरी दिसून आले, तसेच घाउक व्यापाऱ्यां पेक्षा किरकोळ व्यवसायावर जीएसटीचा परिणाम झालेला दिसत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top