फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके तर उपसभापती संजय त्रिभुवन यांची वर्णी

0
B-N-N
योगेश तुपे 



फुलंब्री येथील पंचायत समिती सभापती उपसभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांत अंतर्गत नाराजीचा सूर दिसून आला . भाजपच्या सातपैकी चारच सदस्य या निवडणूक प्रक्रियेत उपस्थित होते . 

तर काँग्रेसचा असलेला एकच सदस्यही गैरहजर राहिल्याने एकूण आठ सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य हजर , तर काँग्रेसच्या एका सदस्यासह भाजपचे तीन सदस्य गैरहजर राहिले . 

मात्र सभापतिपदासाठी सविता फुके , तर उपसभापतिपदासाठी संजय त्रिभुवन यांनीच केवळ उमेदवारी दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली . यात सभापतिपदी सविता फुके , तर उपसभापतिपदी संजय त्रिभुवन यांची एकमताने बिनविरोध निवड झाली . 


ही निवड बिनविरोध होणार होती , म्हणून सदस्य थांबले नाही , असे भाजपमधून सांगत होते . सभापतिपदी सविता फुके , तर उपसभापतिपदी संजय त्रिभुवन यांची बिनविरोध निवड झाली , यांना जे सदस्य सूचक होते त्यांचीच येथे उपस्थिती होती . सकाळी दहापर्यंत सर्व सदस्य उपस्थित होते . गेल्या दोन दिवसांपासून या पदासाठी बैठका होत होत्या . 

सोमवार रोजी वरील नावांवर हरिभाऊ बागडे यांनी शिक्कामोर्तब केले ; मात्र खदखद कायम होती . सकाळी ऐश्वर्या गाडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा हट्ट केला ; मात्र त्यांना दवावतंत्राने तो भरू दिला नाही . यावर भाजप कार्यकर्त्यांत बराच गदारोळ झाला . शेवटी चार सदस्य येथून निघून गेले . सभापती सविता फुके यांना माजी उपसभापती एकनाथ धटिंग हे सूचक होते , तर उपसभापती संजय त्रिभुवन यांना माजी सभापती सर्जेराव मेटे हे सूचक होते . 

यामुळे हेच चार सदस्य या निवडणूक प्रक्रियेत उपस्थित होते . तर ऐश्वर्या गाडेकर, नाथा काकडे, सोनाली सोनवणे यांनी तेथून पळ काढला . अखेर चार सदस्यांवर ही निवडणूक बिनविरोध झाली यावेळी माजी सभापती सर्जेराव मेटे , उपनगराध्यक्ष योगेश मिसाळ, एकनाथ धटिंग ,संजय पाथरीकर, विवेक चव्हाण , आबासाहेब फुके आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top