B-N-N
समाधान घुले
अपंग समाजकल्याण विभाग यांच्या मार्फत संचिका जमा करुनही कर्ज देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी सोमवारी सोयगावला दिव्यांगांच्या वतीने बँकेसमोर उपोषण करण्यात आले होते.नगरसेवक योगेश मानकर यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दिव्यांगाना स्वयं रोजगार मिळावा करीता अर्थसहाय्य करण्यात येते.अनेक दिवसापासुन धुळ खात पडलेली कर्ज संचिका दि.२३ डिसेंबरला बँकेने झोनल ऑफीसला पाठवली होती,यापूर्वी अपंगांनी अनेकदा चकरा मारूनही संबंधित बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अपंगांच्या वतीने प्रहार संघटनेचे संदीप इंगळे सोमवारी थेट बँकेच्या समोर उपोषण सुरु केले.
अखेरीस दोन महीन्याच्या आत अर्थसहाय्य करण्यात येईल तसेच कर्ज संचिका पाठविण्यासाठी करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत चौकशी करण्यात येईल,व बॅक इमारतीस आठ दिवसात रॅम्पची व्यवस्था करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे अपंग व्यक्ती संदीप इंगळे यांचे तात्पुरते आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
यासाठी योगेश भाऊ मानकर, चंद्रास अप्पा रोकडे, संजय मिसाळ, कृष्णा पाटील जुनगरे, गणेश कापुरे, सचिन शिंदे, ईश्वर इंगळे सुरेश सोनवणे, लक्ष्मण इंगळे, संजय मोरे, शिवाजी दौड, दत्ता गाडेकर यांनी मध्यस्थी करुन उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लोखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.