B-N-N
अजहर शेख
विनोद कैलास गणराज (21) रा. जातेगाव असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद गणराज तालुक्यातील जातेगाव येथून दुचाकीवरून क्रमांक एम. एच. 20 ई. एन. 9693 ) वैजापूरला येत होता.
त्याचवेळी अशोक लेलंड ट्रक ( क्रमांक एम.एच. 20 बी.जी. 9606 ) गंगापूरहून वैजापूरकडे येत होता. तालुक्यातील वीरगाव चौफुलीवर ट्रक तिडीकडे वळण घेत असताना दुचाकी व ट्रकचा अपघात होऊन विनोद हा जागीच ठार झाला.
या घटनेनंतर नागरिकांनी विनोदला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक गणेश कोकाटे हा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी राञी उशिरापर्यंत वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अजहर शेख
ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना 21 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील वीरगाव फाट्यावर घडली. अपघातानंतर ट्रकचालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला.