बिंदासन्यूजचा दणका-आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन झाले खडबडून जागे

0
B-N-N
अरूण हिंगमीरे


नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे डेंग्यू, हिवताप, टायफॉईड इत्यादी रुग्णांमध्ये वाढ सांडपाण्याच्या गटारी कचरा आणि मैल्याने तुडुंब भरल्याने गावात डासांचा उद्रेक झाला असल्याचे वृत्त दि. २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाले होताच  या वृत्ताची दखल घेऊन, आरोग्य विभागासह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. 
 व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशोक ससाणे, बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बि.डी. बोरुड,  यांच्या उपस्थितीत गावात तातडीने डास निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.



त्याचप्रमाणे आरोग्य विभागातर्फे गावात जन जागृती मोहीम राबवून सर्व्हेक्षण करण्यात आले यावेळी पाण्याचा साठा करण्यात येणाऱ्या टाक्यांची,भांड्यांची ,  तपासणी करण्यात आली, व आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा, डेंग्यू या आजाराचे डास स्वच्छ पाण्यावर आपले अंडी घालतात व त्यातुन निर्माण होणाऱ्या त्यांच्या उत्पत्ती पासून व तो डास ज्यांना चावला त्यांना डेंग्यू हा आजार होतो, 
त्याचप्रमाणें आपला परिसर स्वच्छ ठेवा, रिकामे पडलेले टायर्स, घराच्या छतावर आडगळीत पडलेल्या इतर वस्तूमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची निर्मिती होणार नाही या बाबत काळजी घेण्यात यावी इत्यादी मार्गदर्शन नागरिकांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशोक ससाणे, बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बि.डी. बोरुड यांनी केले. तसेच नागरिकांनी साठवलेल्या पाण्यात सरासरी अंदाजे १०० लीटर पाण्यात  डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून १० मिली येबीट नावाचे औषध टाकण्यात आले. 


तसेच डेंग्यू आजाराने पिढीत रुग्णांची प्रत्यक्ष भेट त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. व तसेच त्यांच्या रक्ताचा नमुना घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी फलके आणि सरपंच जयश्री लाठे यांनी गावातील सांडपाण्याच्या गटारीतील साचलेला मैला काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून येत्या दोन दिवसात पुर्ण होईल असे सांगितले. 

वरील मोहीम राबविण्यासाठी आरोग्य सहाय्यक साळुंके, आरोग्य सेवक विशाल देवरे, आरोग्य सेविका आणि सर्व आशा कर्मचारी ग्रामविकास अधिकारी संजय फलके, ग्रामपंचायत कर्मचारी सोपान खिरडकर आणि इतयांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top