B-N-N
अरुण हिंगमिरे
नाशिक
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर येथून 16 लाख रुपयांची औषधे असलेला ट्रक चोरटे पळून नेत असताना नाशिक तालुक्यातील मुंगसरा शिवारात तो पलटी झाल्याची घटना घडली होती हा ट्रक लुटणार्या टोळक्यास ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेआहे. संदीप शिवाजी गायकवाड 32 व आकाश शिवाजी गायकवाड राहणार वेळुंजे गणेश पाराजी गांगुर्डे 28 तळेगाव काचुरली हे तीघे तालुक्यातील त्रंबकेश्वर ( हल्ली मुक्काम भंदुरे वस्ती सातपूर/मुळेगाव ता.नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक कडून मुंबईकडे औषध साठा घेऊन जाणारा ट्रक एम एच झिरो फोर सी ए 77 64 या ट्रकचालकास चोरट्यांनी मारहाण करून रविवारी दिनांक 22 रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शिवारातून ट्रक पळविला होता याप्रकरणी ट्रक चालकाने वाडीवरे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
चोरटे भरधाव वेगाने गिरणारे मार्गे मुंगसरा - दरी- मातोरी रस्त्याने पेेेठरोड कडे घेऊन जात असताना मुंगसरा शिवारात ट्रक पलटी झाला लाखो रुपयांचा औषधांचा साठा व ट्रक रात्रीपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने सोमवारी दिनांक 23 रोजी ग्रामस्थांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली होती.त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता, वील्लोळी येथील घटना घडलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयित त्यामध्ये आढळून आले त्यांची कसून चौकशी केली असता ते जिंदाल कंपनीतील कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना त्यांच्या घरून ताब्यात घरुन ताब्यात घेतलेआणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता कामावरून सुटल्यानंतर घरी येत असताना त्यांनी संबंधित ट्रकला हात देऊन थांबविला होता त्यात बसून पुढे गेले असता चालकास हातातील जेवणाच्या रिकाम्या डब्याने मारहाण करुन चालकास जैन मंदिराजवळ ट्रक मधून उतरून देऊन औषधांचा साठा असलेला ट्रक भरधव वेगाने घेऊन पळूूूून जात असताना मुंंगसरा शिवारात ट्रक पलटी झाला यामध्ये चौघांनाही जखमा झाल्यानेे त्यांनी तिथून पळ काढत आपल्या घरी आले मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक केे.के.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस हवा. रवींद्र वानखेडे, सागर शिंपी आणि पोलीस पथकाने कार्यवाही करत वरील गुन्हेगारांना जेरबंद केल्याने पोलीस पथकाचे अभिनंदन होत आहे.