देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी पुरुषांना सोहळे आणि महिलांना साडी नेसूनच गाभाऱ्यात दिला जाणार प्रवेश

0

सप्तशृंगी देवस्थानचा महत्वपूर्ण निर्णय १ जानेवारी पासुन होणार अंमलबजावणी


B-N-N
अरुण हिंगमिरे
कळवन,नाशिक


नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या ळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आता गाभार्‍यात जाऊन दर्शन मिळणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय सप्तशृंगी देवी ट्रस्टने घेतला आहे आरती आणि पुढच्या कालावधीत नोंदणी केलेल्या भाविकांना गाभाऱ्यात दर्शन घेण्यास परवानगी दिली जाणार आहे,परंतु यासाठी पुरुषांना सोहळे आणि महिलांना साडी नेसूनच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे महिलांच्या अंगावर शाल पांघरावी लागणार आहे देवस्थानचे पवित्र राखण्यासाठी वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त डॉ रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, उन्मेश गायधनी, व्यवस्थापक सुरेश दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान मेरकर  आदी उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टने घेतलेला निर्णय येत्या 1 जानेवारी २०२० पासून लागू केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यादरम्यान भाविक आणि देवी यांच्यातील नाते अबाधित  राहणार असून देवीच्या पादुकांवर डोके ठेवून नियमित येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येईल, तसेच भाविकांसाठी कुठल्याही प्रकारचे नियम घालण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यातील विविध देवस्थान कडून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे त्याच धर्तीवर आता सप्तशृंगी गडावर देखील ऑनलाइन दर्शन व भक्त निवास बुकिंग साठी ॲप लॉन्च केले जाणार आहे, पहिलाच प्रयत्न असल्याने साधारण एक मार्च पर्यंत काम होणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

तसेच देवस्थानच्या वतीने गडावर भाविकांसाठी महत्त्वाची कामे केल्या जात आहे भक्तनिवासच्या जुन्या 36 खोल्या नूतनीकरणाचे काम हाती घेतलेले आहे पहिल्या पायरीवरील दर्शन रांग इमारतीचे काम अंतिम स्वरूपात आले असून नवरात्रात भाविकांचे हाल होणार नाही यासाठी पंढरपूरच्या धरतीवर काम केले जात आहे  गाभाऱ्याच्या बाजूच्या खोलीचे काम होणार असून ई-निविदा काढली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top