श्रीमती सुनंदा शिंदे राज्यस्तरीय आदर्श महिला पोलीस पाटील सेवा गौरव पुस्कारने सन्मानित

0
B-N-N
औरंगाबाद 
     

        सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणूसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय यांच्या वतिने सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनिय कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय *"आदर्श सेवा गौरव पुरस्कार "* २०१९ हा आज दिनांक ३०/१२/२०१९ रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या उपजिल्हाअधिकारी श्रीमती अंजली धानोरकर मॅडम,हास्सकवी विष्णु सुराशे, पोलीस निरीक्षक एस डी शिनगारे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, विश्वास पाटील व सुमित पंडीत या मान्यवरांच्या हस्ते एकोडी सागज येथिल आदर्श महिला पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा  उपाध्यक्षा श्रीमती सुनंदा पोपटराव शिंदे यांना त्यांच्या उत्कृष्ट समाज कार्याची दखल घेऊन आदर्श सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले .

 श्रीमती सुनंदा शिंदे या औरंगाबाद जिल्ह्यातील व राज्यातील पहिल्या महिला पोलीस पाटील आहे ज्यांना हा "आदर्श सेवा गौरव" पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागातील एका महिला पोलीस पाटलला हा पुरस्कार मिळाला असल्यामुळे संपुर्ण वैजापुर तालुक्यात व जिल्ह्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पोलीस पाटील 


संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री  भिकाजी पाटील साहेब ,महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे, राज्य सहसचिव श्री गोरख पाटील टेंमकर, मराठवाडा अध्यक्ष जब्बार पठाण, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील जगताप, उपविभागीय अधिकारी श्री संदिपान सानप साहेब, तहसिदार श्री गुंडेमवार साहेब, नवनाथ धुमाळ, साहेबराव तावरे,विरगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब, बरडे साहेब,बाबासाहेब धनुरे, विजय सरोदे , मोरे साहेब,वैजापुर तालुका अध्यक्ष कारभारी निघोटे, तालुका उपअध्यक्ष गणेश नरहरे, हरीभाऊ लघाने, राजु आहेर,पोपटराव 


शिंदे,सुर्यकांत मोटे,पोलीस पाटील हिराबाई दहिटे,वनमाला धोर्डे, स्वाती कदम,राजश्री गायकवाड, हरीभाऊ खटाणे, रमेश विघे, सचिन मदणे, विजय भराडे, प्रविण डुमाले, अनिता सुर्यवंशी, सविता उगले,सविता सरोवर, वासुदेव बोर्डे, बुट्टे पाटील,लकारे पाटील,धीवर पाटील, योगेश साळुंके, गणेश जाधव, जिल्ह्यातील व राज्यातील सर्व पोलीस पाटील बंधु भगिनींनी श्रीमती सुनंदा शिंदे यांचे अभिनंदन केले आहे . *शुभेच्छुक:- श्री कारभारी पाटील निघोटे तालुका अध्यक्ष पोलीस पाटील संघटना वैजापुर*

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top