B-N-N
समाधान घुले
फर्दापूर-चाळीसगाव राज्यमार्गावरील बनोटी-वरठाण आणि फर्दापूर-सोयगाव या रस्त्यादरम्यान एकाच दिवशी झालेल्या रस्तालुटीतील प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून शनिवारी रात्री या प्रकरणातील सिल्लोड तालुक्यातील पाच पैकी तीन आरोपींना अटक केले आहे.
यातील एक आरोपी दर्यापूर ता.अकोट पोलिसांनी अटक केलेला असल्याने रविवारी या पाच पैकी अटकेत असलेल्या तीन आरोपींना सोयगावच्या न्यायालयात हजर केले असता,तिघांची(दि.२४)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने रविवारी दिले आहे.
सोयगाव तालुक्यातून जाणाऱ्या एकमेव फर्दापूर-चाळीसगाव राज्यमार्ग क्र-२३ वरील बनोटी-वरठाण आणि फर्दापूर-सोयगाव या रस्त्यादरम्यान बुधवारी(दि.११)रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी दरोडेखोरांनी धाडसी रस्तालूट करून दोन्ही घटनेत ५१ हजाराचा मुद्देमाल लांबविला होता.या प्रकरणी बनोटी-वरठाण रस्त्यावरील रस्तालुटीत देवळांना(ता.कन्नड)येथील बियाण्यांचा व्यापारी विष्णू फाळके हा तिडका गावाकडून बनोटीकडे जात असतांना वरठाण जवळील हिवरा नदीच्या पात्रावर चारचाकी वाहन क्र-एम,एच-२० ई-जि-१९१८ अडवून रस्ता लुट करून दहा हजार रु आणि फर्दापूर-सोयगाव रस्त्यावर जंगलातांडा शिवारातील वरखेडी(खु) येथील मोटारसायकलस्वर मनोज ठाकूर याचेकडून ४१ हजार रु मुद्देमाल लुटला होता.या
दोन्ही प्रकरणी सोयगाव आणि फर्दापूर पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल झाल्यावर स्र्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोयगाव,फर्दापूर घटनास्थळी भेटी देवून तपासचक्रे सुरु केले.
यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात दोन्ही गुन्हे एकाच टोळक्यांनी केल्याचे निष्पन्न होताच तपास चक्रे गतिमान फिरविण्यात आली.या तपासात तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून हि रस्ता लुट प्रकरणात जितेंद्र मन्साराम चव्हाण(वय २५ रा.उमरा ता.अकोट जि.अकोला सध्या वास्तव्यास मांडणा ता.सिल्लोड),अक्षय श्रीराम लबडे(वय २४)विकास दारासिंग जाधव(वय १९ रा.मांडणा ता.सिल्लोड)दीपक शेषराव पवार(वय १९)मंगेश ज्योतीराव बावणे(वय २६,रा.मुंडगाव ता.अकोट)या पाच जणांना चौकशीवरून अटक करण्यात आली आहे.यामधील जितेंद्र चव्हाण व अक्षय लबडे यांच्या विरुद्ध यापूर्वी अकोला,अमरावती,आदिलाबाद या ठिकाणी गुन्हे दाखल
मिरचीतोड मजुरांमध्ये आरोपी लपून-
या रस्तालुट प्रकरणातील अटक करण्यात आलेले पाचही आरोपी परजिल्ह्यातील आलेल्या सिल्लोड तालुक्यातील मिरची तोड मजुरांमध्ये हे आरोपी लपून बसले असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या पाचही आरोपींना ताब्यात घेतले होते.