पेठ वन विभागाची कामगिरी | वीनापरवाना तोडलेले सागवान जप्त

0
B-N-N
अरूण हिंगमीरे


पेठ तालुक्यातील गांडोळे गावालगत वन विभागाच्या हाद्दीतील विनापरवाना सागवान झाडांची तोड केलेली ३.५ घनमीटर चौपाट तयार केलेली लाकडे जप्त केले आहे.


सविस्तर वृत्त असे की, पेठ तालुक्यातील गांडोळे गावालगत वन विभागाच्या हाद्दीतील सागवान झाडांची विना परवाना तोड करुन काही अज्ञात लोक करणार असल्याची गुप्त खबर मिळाल्या वरुन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक एस. एस. मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविकास महामंडळाचे झरी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. जाधव आंबे वनपरिक्षेत्र 
अधिकारी पी. एस. खंदाने फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी  के एल भांगरे वनपाल डी. डी. पवार, एस. बी. राऊत, दळवी, वानखेडे, देशमुख, पवार, चौरे, भोये अदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावालगत टोकुर्णा नाल्याजवळ छापा टाकला असता ३.५ घनमिटर चौपाट   केलेले  ३१ नग सागवान लाकुड आढळून आले. यावेळी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहून संशयीत इसम फरार झाले असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.


यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पहानी करून वरील बेकायदेशीर तोडण्यात आलेले 
 सागवान झाडांचे ३.५ घनमीटर चौपाट केलेले३१ नग लाकूड शासकीय वाहनाने पेठ डेपोमध्ये येथील
आणण्यात आला आहे. यावेळी सागवानाची तस्करी करणारी मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पेठ येथून साधारण सात ते १५ कि.मी. अंतरावर गुजरात राज्याची हाद्द असल्याने सतर्क राहण्या बाबत वन परीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक एस.एस.मुुुसळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आदेेश दिले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top