B-N-N
समाधान घुले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार होते तर व्यासपीठावर धरणगाव महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. बी. एफ. शेख यांचेसह कार्यक्रमाधिकारी डॉ. सुशील जावळे, डॉ. गोविंद फड़, डॉ. सैराज तड़वी, डॉ. शंतनु चव्हाण यांची उपस्थिती होती.
प्रा.आंधळे यांच्या भाषणात कविताच्या संस्काराची पेरणी व तिची रुजवात मानवी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी होत जाते हे सप्रमाण सांगतांना अंगाईगीत, बड़बड़गीत, पर्यावरणगीत, सामाजिक आशयाच्या कविता, राष्ट्रभक्तीच्या कविता सादर करीत कधी रंजनाच्या अंगाने तर कधी झणझणीत अंजन घालून काव्यसंस्काराची अक्षरशः सरबत्ती केली. मुसळधार होणाऱ्या काव्यवर्षावाने विद्यार्थिवृंद चिंब भीजत उत्स्फूर्त दाद देत गेला.
प्रस्तुत प्रसंगी डॉ. बी. एफ. शेख यांनी व्यक्तिमत्वविकासाच्या घडणीत अश्या शिबिरांचा मोठा वाटा असतो असे मत मांडित मार्गदर्शन केले, तर अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार यांनी संस्कार क्षमतेचे दायीत्व साहित्याकडेच कसे असते या संदर्भात यथोचित मार्गदर्शन केले.
दोन तास चाललेल्या या बौद्धिक सत्राची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वर्षा काळे, कु. तेजस्वीनी लाठी यांनी केले तर आभार दुर्गेश जोशी या विद्यार्थ्याने मानले.
समाधान घुले
सोयगाव: कथा कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र ह्या साहित्यप्रकारांनी आपआपले क्षितीज समृद्ध करित मानवी जीवनही समृद्ध केले हे खरे असले तरी आबालवृद्धांच्या अंतरंगी चिरंजीवित्वाचा मान मिळवणारा साहित्य प्रकार कविताच आहे अशी स्पष्टोक्ती खान्देशकवी तथा गज़लकार प्रा.वा.ना.आंधळे यांनी केली. ते अजिंठा शिक्षण संस्था,औरंगाबाद संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरार्थींसमोर बोलत होते.