B-N-N
अरुण हिंगमीरे
आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही हि भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ज्या गोरगरिब शेतकऱ्याचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल. मी आज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करतो. ही योजना मार्चपासून लागू होईल. मधले दोन महिने सरकारला तयारीसाठी पाहिजे आहेत. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. या योजनेतील पैसा थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जाईल. याला कोणत्याही अटी शर्तींचा अडथळा येणार नाही.”
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या हंगामाचे जे कर्ज जूनमध्ये थकीत होईल ते कर्ज देखील पुनर्गठित करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांना कोठेही अडचण येणार नाही, याचंही वचन मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देतो, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकार एक योजना आणणार असल्याचं सांगितलं. या योजनेवर काम सुरु असून लवकरच या योजनेची घोषणा करु, अशी हमी उद्धव ठाकरेंनी दिली. ते म्हणाले, “राज्याची स्थिती चांगली असेल, नसेल हे कालांतराने लोकांसमोर येईलच. राज्याची परिस्थिती कशीही असली तरी ती परिस्थिती सुधारण्याची हिंमत आणि ताकद या सरकारमध्ये आहे. सर्व गोष्टींचं सोंग आणता येतं मात्र, पैशांचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे सर्वजण सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. एक नवं आणि धाडसी पाऊल हे सरकार टाकत आहे.”
अरुण हिंगमीरे
पहा कशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा . यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करत सभात्याग केला.