एसबीआय बँकेच्या इमारतीला लागली आग

0
B-N-N
धनंजय माने


धनंजय माने बीड ,बीडशहरातील जालना रोडवर स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखा आहे. या शाखेमध्ये रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. रविवारी सुटी असल्याने बँक बंद होती. असे असताना नेमकी आग कशामुळे लागली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळी बीड पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले आहे.


बीड शहरातील जालना रोडवर एसबीआय बँकेची मुख्य शाखा आहे. गेल्या दहा वर्षापासून ही शाखा असून शाखेची इमारत मोठी आहे. या शाखेच्या खिडकीमधून धूराचे लोट निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर थोड्याच वेळात धुराचे लोट वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. दरम्यान, घटना समजताच बीड शहर पोलीस, 
ग्रामीण पोलीस यांच्यासह अग्निशमनचे पथक आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. घटनास्थळी बँकेचे अधिकारी अद्याप पोहोचलेले नाहीत. या संदर्भातील माहिती बँक अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. ही आग कशामुळ लागली? हे समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्रथमदर्शी शक्यता अग्निशमनचे अधिकारी कानतोडे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top