B-N-N
सराला बेट, औरंगाबाद
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान सराला बेटाचे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या ११७ व्या पुण्यतिथी महोत्सवात (दिं .२६) काला किर्तनातून संत तुकाराम महाराज यांच्या गौळण प्रकरणातील ‘लक्ष लाऊनी अतंरी,कृष्ण पहाती नरनारी ’ या गौळणीचे निरुपण महंत रामगिरी महाराजांनी केले.
ही आवरणं दूर झाली तरच निखळ भाव प्रकट होतो. भाव आपल्यात कसा असतो, याचं उत्तर द्यायचं झाल्यास जशी एखाद्या दगडातच मूर्ती असते, तसाच आपल्या अंत:करणात भाव असतो. मूर्ती घडवताना शिल्पकार दगडाची निवड करतो. निवड केलेल्या दगडात दुसरी मूर्ती आणून बसवत नाही; तर त्या दगडामध्येच घडवतो.
याप्रसंगी महाराजांनी बेटातील सेवा वाढत्या भाविकांच्या गर्दीने तोकड्या पडत असल्यामुळे सक्षम उपाययोजना कराव्या लागतील असे सांगितले .पोलीस प्रशासनच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
या पुण्यतिथी सांगता प्रसंगी आमदार प्रा.रमेश बोरनारे,आमदार लहुजी कानडे,नगराध्यक्ष अनुराधा आदीक,साबेर भाई खान,दिनेश परदेशी,एकनाथ जाधव,माजी सभापती अविनाश गलांडे ,बाबासाहेब जगताप,बाळासाहेब कापसे,सचिन जगताप,बाबासाहेब चिडे,शिवाजी ठाकरे,दत्ता खपके,राजु गलांडे ,सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज ,आदिसह गंगागिरी महाराज फडातील सर्व महाराज मंडळी व लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.आज २०० ते २५० गावोगावावरून दिवसभर आलेल्या भाकरी व आमटीचा महाप्रसाद दिवसभर सुरू होता
सराला बेट, औरंगाबाद
भावाशिवाय देव जसा कळत नाही, तसा गुरूशिवाय अनुभव मिळत नाही. गुरूशिवाय खरं ज्ञानही प्राप्त होत नाही. संतसाहित्यात संतांनाच त्यांच्या भक्तांनी गुरू मानलं आहे. म्हणूनच तर `संतांचे संगती तरणोपाय’, असं म्हटल्याप्रमाणे अज्ञानाच्या निद्रेतून जाग्या करणा-या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत,साधुसंताचा परमार्थ समाज हितासाटीच असतो असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान सराला बेटाचे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या ११७ व्या पुण्यतिथी महोत्सवात (दिं .२६) काला किर्तनातून संत तुकाराम महाराज यांच्या गौळण प्रकरणातील ‘लक्ष लाऊनी अतंरी,कृष्ण पहाती नरनारी ’ या गौळणीचे निरुपण महंत रामगिरी महाराजांनी केले.
महाराज म्हणाले की,भाव हाच भगवत भक्तीतील अत्यंत भरवशाचा मार्ग आहे. मात्र तो सहज उपलब्ध होत नाही. तो कोणत्या बाजारात मिळत नाही. तो आपल्या अंत:करणातच प्रकट व्हावा लागतो. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीमध्ये भाव असतो. मात्र त्याच्याभोवती आशा, आकांक्षा, दंभ, अहंकार याची आवरणं असतात.
ही आवरणं दूर झाली तरच निखळ भाव प्रकट होतो. भाव आपल्यात कसा असतो, याचं उत्तर द्यायचं झाल्यास जशी एखाद्या दगडातच मूर्ती असते, तसाच आपल्या अंत:करणात भाव असतो. मूर्ती घडवताना शिल्पकार दगडाची निवड करतो. निवड केलेल्या दगडात दुसरी मूर्ती आणून बसवत नाही; तर त्या दगडामध्येच घडवतो.
मूर्ती भोवतीचा अनावश्यक भाग काढून टाकतो. अनावश्यक भाग काढून टाकल्यानंतर जशी मूर्ती प्रकट होते, तशीच आपल्या अंत:करणात अनावश्यक असणा-या विकाराची आवरणं दूर सारली की, भगवंताविषयीचा भाव प्रकट होतो. त्यानेच भगवंत आकळला जातो असे महाराज म्हणाले.पुण्यतिथी उत्सवाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली.