Bnn...
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन वंचित बहुजन आघाडीचा नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील बंदला नागरिकांनी शंभर टक्के उतस्फुर्त प्रतिसाद दिला .
काल शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांना लासुर स्टेशन बंदबाबतचे निवेदन वंचित आघाडीचे गंगापूर तालुका सरचिटणीस यांनी दिले होते आज सकाळीच वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून व्यापारी वर्गाला बंदबाबत माहिती देऊन आपली व्यापारी आस्थापने बंद करण्याचे आवाहन केले व तदनंतर व्यापार्यानी आपापली व्यापारी आस्थापने बंद केली व बंद शंभर टक्के यशस्वी करण्यास मदत केल्याने वंचित आघाडीच्या वतीने सर्व व्यापाऱयांची आभार मानले.
यावेळी बोलताना संदीप गायकवाड म्हणाले की भाजप सरकारने जो नागरिकत्व कायदा लोकसभा व राज्यसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर घेतला परंतु हा कायदा एकप्रकारे संविधानावर घाला करू शकतो कारण सर्वच जनतेकडे जुने महसुली रहिवाशी पुरावे असतील असे वाटत नाही त्यामुळे विनाकारण चोर सोडून संनाश्याला फाशी देण्याचा प्रकार भाजप सरकार जाणून बुजून करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
वंचित आघाडीकडून निवेदन स्वीकारण्याकरिता मात्र महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी या अधिकाऱ्यांकडून वरातीमागून घोडे करण्याचा प्रकार पाहावयास मिळाला कारण लासुर स्टेशनचे तलाठी व मंडळ अधिकारी कुलकर्णी हे मात्र निवेदन शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पी.आय.सय्यद यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आगमन झाल्याने कार्यकर्त्यांत मात्र नाराजी पसरली होती यावेळी ग्रामपंचयत सद्यस्य जयदेव जाधव,संदीप गायकवाड,छोटू पठाण,कल्पेश पगारे,फारुख शेख,मोहसीन बागवान,अन्वर बागवान,आदींसह वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांची व भीमसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.