B.N.N
अरुण हिंगमिरे
चाळीसगाव
अंनत विभूषित जगद्गुरु स्वामी नरेन्द्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन व् प्रवचनाचा कार्यक्रम चाळीसगावी दि 3 जानेवारी रोजी अविनाश नाना चौधरी यांच्या प्रांगनात मालेगांव रोड, येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सकाळी 9:00 वा शिवाजी चौक सिग्नल पॉइंट येथून कार्यक्रम स्थळा पर्यन्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली, यावेळी ढोल ताश्या,बैंड पथक,घोड़ सवारी तसेच फटाक्याच्या आतिश बाजी करण्यात आली. मिरवणुकीत सर्वात पुढे महिलांंनी आपल्या डोक्यावर कलश आणि तुळशी रून्दावन होते.उत्कृष्ट असे भजनी मंडळ,
आदिवासी महिला पथकाने अत्यंत शिस्त बद्ध पणे नृत्य सादर केले.
.या मिरवणुकीत सुमारे 10 हजार भाविक सहभागी झाले होते.मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने उत्कृष्ट् सहकार्य केले. दुपारच्या सत्रात मंडपात भाविकानी वैयक्तिक व सामुदायिक पद्धतीने पादुका पूजन केले. नंतर नाणिजधाम येथील प्रबोधनकार श्री सूर्यकांत माळी यांनी गुरु आज्ञेनुसार अमृततुल्य असे प्रबोधन केले.त्यानंतर जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज यावेळी ऑनलाइन अध्यात्म, विज्ञान व व्यवहार यांची सांगड घालून मानवी मनाचा विकास कसा होईल, आध्यात्मिक व् सामाजिक विकास कसा होईल यावर उत्कृष्ट् असे ज्ञानामृत मार्गदर्शन केले. त्यानंतर लिलामृत ग्रंथाचे परायण झाले.
याप्रसंगी कार्यक्रमात 377 भाविकानी साधक दिक्षा घेतली व नंतर दुपारी 2:30 वा सर्व भाविकानी
महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी जळगाव चे खासदार मा.उन्मेषदादा पाटिल, नगरसेवक सोमसिंग राजपूत, नगरसेविका सौ विजया भिकन पवार, कैलास बापू सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
गुरु माउलीनी सर्व भविकांना भर भरुन आशिर्वाद दिले. शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी आरती घेऊन व पुष्परुष्टी करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदगुरु नरेंद्राचार्य महाराज जिल्हा सेवा समिती जळगाव पच्छिमचे अमोल कुलकर्णी जळगाव जिल्हा निरीक्षक व चाळीसगाव तालुका सेवा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तसेच सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.