नाशिक जिल्ह्याच्या ४२५ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता नाशिक जिल्ह्याच्या सन २०२०-२१ सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ७६.१४ कोटींची भरीव वाढ

0


B.N.N
अरुण हिंगमिरे
नाशिक

 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ बाबतच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्याला घालून देण्यात आलेल्या ३४८.८६ कोटींच्या मर्यादेत ७६.१४ कोटी रुपयांची भरीव वाढ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री  ना.अजित पवार यांनी केली. त्याबद्दल राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.

  सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मध्ये नाशिक जिल्ह्यासाठी शासनाने रुपये ३४८.८६ कोटीची आर्थिक मर्यादा दिलेली होती. मात्र नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात करावयाच्या कामांबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केलेली होती. त्यानुसार आपण रुपये ७६.१४ कोटी इतका नियतव्यय वाढवून एकूण रुपये ४२५ कोटी भरीव नियतव्यय मंजूर केला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्हा नियोजन विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत ना.छगन भुजबळ यांनी वाढीव तरतुदीची मागणी केली. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top