नांदगाव तालुक्यातील घटना मानलेल्या मामानेच तरुनीस एकांतात बोलवून केला अत्याचार

0
BNN
अरूण हिंगमीरे 


नांदगाव तालुक्यात मानुसकीला आणि नातेसंबंधास कलंक लावनारी घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात मानलेल्या मामानेच शेतामध्ये एकांतात बोलून एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना ऑगस्ट 2019 मध्ये घडली आहे. या घटनेची वाच्यता केल्यास तुझी व तुझ्या कुटुंबियांची बदनामी करेल अशी धमकी संशयिताने दिल्याने पीडित तरुणीने याबाबत कोणालाच काही सांगितले नव्हते.

मात्र काही दिवसांपासून पिडीतेला उलट्या आणि मळमळीचा त्रास जानवू लागल्याने मंगळवारी दिनांक 7 जानेवारी रोजी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले होते.

त्यानंतर तीने तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराबाबत आपल्याला आईला सांगितल्यानंतर दि.८ जानेवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
त्यानुसार संशयित रवी मंगा पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


सविस्तर माहिती अशी की मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पीडित तरुणी मेंढ्या चारत असताना तिच्या घराशेजारील राहणारा व मानलेला मामा रवी पवार हादेखील मेंढ्या चारण्यासाठी तिथे पोहोचला त्यांनी तिला बोलवुन तुझ्याकडे काम आहे असे सांगून शेतात बोलवुन रात्रीच्या सुमारास तिच्यावर अत्याचार केला व या घटनेची कोठेही वाजता केल्यास तुझी व तुझ्या परिवाराची बदनामी करेल अशी धमकी दिली होती,  त्यामुळे पीडित तरुणीने घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितले नाही.

परंतु पीडितेला अनेक दिवसांनी मळमळ आणि उलट्यांंचा त्रास जानवू लागल्याने मंगळवारी दिनांक ७ जानेवारी रोजी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर खात्री करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर पीडितेच्या आईवडिलांनी या घटनेची मानसिक धक्का बसल्याने त्यांनी दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील पोलीस करत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top