B-N-N
समाधान घुले सोयगाव
शेती पंपाच्या रोहित्रावर वीजतारा ओढण्याच्या कामासाठी परमीट घेवूनही महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीज प्रवाह सोडल्याने झिरो वीज कर्मचाऱ्याला रोहित्रावर विजेचा धक्का बसून दूरवर फेकल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना उमरविहीरे ता.सोयगाव शिवारात घडली.यातील गंभीर वीज कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी पाचोरा जी.जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उमरविहिरे ता.सोयगाव शिवारात महावितरणचा झिरो कर्मचारी मोहन नारायण परदेशी(वय ३५)हा रोहीत्रावरील बिघाड झालेल्या वीज तारांना ओढणी करून सुरळीत करण्याचे काम करत असतांना अचानक या रोहीत्रावरील वीजप्रवाह सोडल्या गेल्याने हातात असलेल्या वीज तारांसह रोहीत्रावरील कर्मचारी फेकल्या जावून विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाला आहे.या घटनेमुळे उमरविहीरे शिवारात खळबळ उडाली होती.
दरम्यान काम करण्यासाठी परमिट घेवूनही वीज सुरु कशी झाली याबाबत साशंकता निर्माण झाली असून या झिरो कर्मचाऱ्याला मात्र या विजेचा धक्का बसल्याने त्याला गंभीर जखमी झाला आहे.प्राथमिक उपचारासाठी त्यास पिंपळगाव हरे ता.पाचोरा येथे दाखल करण्यात आल्यावर वैद्यकीय सूत्रांनी त्यास तातडीने उपचारासाठी पाचोरा येथे रवाना केले आहे.