B.N.N
अरुण हिंगमिरे
कासारी, नांदगाव
नाशिक
नांदगाव तालुक्यातील कासारी ग्रामपंचायत येथील जलशुद्धीकरण केद्राचे रविवार दि.१२ जानेवारी रोजी तालुक्याचे आ.सुहास कांदे यांच्या हस्ते व आंगणवाडी केंद्राचे लोकार्पन नांदगावचे नगराध्यक्ष राजेश (बबीकाका) कवडे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सुनीताताई इपर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेजदादा कवडे, पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब हिरे, उपसभापती सुशिलाताई नाईकवाडे, जि प.सदस्य रमेश बोरसे, पं स.सदस्या विद्याताई पाटील, मधुबालाताई खिरडकर, सदस्य सुभाष कुटे व विलास आहेर, प्रमोद भाबड, मनोज बुरकुुुले हेे होते.
याप्रसंगी आ.कांदे म्हणाले की, कासारी हे गाव मालेगाव- औरंगाबाद ह्या राज्य मार्गावर असल्याने या जलशुद्धीकरण नागरिकां बरोबर याचा फायदा प्रवाशांना होणार असल्याने कळत न कळत ग्रामपंचायतला उत्पन्नात वाढ होणार असून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचार्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने सुद्धा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प राबवावे जेणेकरून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल असे म्हणाले. यावेळी कांतीलाल इपर यांनी आ. कांदे यांचे पुष्पहार घालून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच येथील धनगर समाजाच्या वतीने कांदे यांना काठी आणि घोंगडी भेट देण्यात आली. आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सुनीताताई इपर यांनी सन २०१८/ १९ मधील चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वरील योजना राबविण्यात आली आहे, येथील कार्यालयात जलशुद्धीकरण करण्याच्या मशनरी बसविण्यात आलेल्या असून तेथून नागरिकांना शुद्ध पाणी वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या नागरिकांना ग्रामपंचायतची मागील पाणी पट्टी, सपाई पट्टी थकबाकी आणि चालू बाकी पुर्ण भरून सहकार्य करतील अशा नागरिकांना मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले तर इतरांना २० लिटर शुद्ध पाणी पाहिजे असल्यास त्यासाठी नाममात्र पाच रुपये शुल्क आकारले जानार आहे असे सरपंच सुनीताताई यांनी यावेळी सांगितले.
वरील कार्यक्रम आटोपल्यानंतर येथील सार्वजनिक स्मशानभूमी ला संरक्षण भिंत आणि चांदेश्वरी नदीवर मंजुरी मिळालेल्या चार सिमेंट ब्लॉक बंधाऱ्याचे उद्घाटन आ.कांदे आणि माण्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. व्ही. काकळीज, उपसरपंच संतोष इपर, सदस्य काशिनाथ काळे, रामचंद्र चव्हाण, अनिल इपर, संजय सोनवणे, सदस्या विठाबाई इपर, सारीकाताई बोरसे, मल्याबाई वाघ, संगीताताई उगले, लंकाबाई पवार यांच्यासह विजय इपर, जयंत सानप, संतोष इपर, संजय उगले, विनोद इपर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.