B.N.N
अरुण हिंगमिरे
जळगाव बु || , नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जळगाव बु || च्या सरपंच गीताबाई संजय गीते यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त जागेवर आज दि.१५ जानेवारी रोजी बुधवारी विषेश बैठक घेण्यात आली होती सत्यभामा कांदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी विषेश बैठकीत आयोजन करण्यात आले होते, त्यात सरपंच पदासाठी सत्यभामा कुशाबा कांदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानेनिवडणूक अधिकारी गोसावी यांनी जाहीर केले. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून माजी सरपंच गिताबाई गीते यांनी सही केली यावेळी ग्रामपंचायतीच्या झालेल्या विशेष सभेस उपसरपंच सिताराम मेंगाळ, लताबाई सोनवणे, मिराबाई अहीरे, दगुबई गीते, मुक्ताबाई गावंडे विजय आव्हाड , पोपट मोरे दिपक थोरे , माणिक कांदे , ग्रामसेवक किरण घुगे, आदी सदस्यांसह माजी सरपंच बाबासाहेब साठे, धनराज बूरुकुल , दत्तात्रय कांदे , रामदास घुगे ,बापूसाहेब आहिरे, संजय गीते ,वाल्मीक कांदे, रघुनाथ सांगळे ,रतन बोडके, दत्तू कांदे, भाऊसाहेब साठे, रघुनाथ गावडे , नवनाथ कांदे, पुंजाबाई बोडके, उत्तम कांदे, भास्कर गावंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रकांत घुगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच कांदे यांचे तालुक्याचे आमदार सुहास कांदे, बापूसाहेब कवडे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, सदस्य सुभाष कुटे, विलास आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अश्विनीताई आहेर आदींनी अभिनंदन केले आहे.