B-N-N
शिवदास सोनोने
बुलढाणा -
दिनांक 14/01/2020 रोजी कृष्णाई गोशाळेच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये समाधान दामधर संचालक कैलासभाऊ डोबे जळगाव जा. कैलासबापु देशमुख प्रदेशाध्यक्ष अ.भा.प. संघ गणेश धुर्डे सर गुलाबराव इंगळे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जिजामातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले समाधान दामधर यांनी पत्रकारांनी संघटित होणे ही काळाची गरज असून आपल्या लेखणीतून सत्यता जनतेसमोर आणावी असे सांगितले नंतर संस्थेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना शाल श्रिफळ व पेन भेट देवून सत्कार करण्यात आला यावेळी अभिमन्यू भगत ,मनीष ताडे, हर्षद इकबाल, राजीव वाडे, गणेश गिर्हे, राजेश बाठे, अश्विन राजपूत, संजय दांडगे, गोपाल अवचार, जयदेव वानखडे, श्रीधर आव्हेकर, शिवदास सोनोने, विनोद वानखडे, आकाश उमाळे, सागर भड, विजय पोहनकार इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृष्णाई गोशाळाचे सचिव प्रा.सचिन हागे व आभार प्रदर्शन गणेश धुर्डे सर यांनी केले. कार्यक्रम यक्षवते साठी आकाश फुसे, गजानन हागे, दत्ता पिंपळकर, विजय कपले, सचिन झुंजारे, पवन सोनोने यांनी प्रयत्न केले
भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली