B.N.N
अरुण हिंंगमीरे
बोलठाण, नांदगाव
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोलठाणचे शिक्षक संतोष मोतीराम बोरसे यांना सन २०१८/१९ या शैक्षणिक वर्षासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्पलोय को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या वतीने नाशिक येथे जनार्दन स्वामी आश्रम (तपोवन) येथे आदर्श शिक्षक पुरस्काराने रविवार दि.१२ जानेवारी रोजी गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामराव बनकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व जिल्हा उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक चे गौतम बलसाने, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, शिवाजी निरगुडे, गोरख सोनवणे, के.एन.आहिरे हे होते.
याप्रसंगी त्यांच्या पत्नी शोभा बोरसे, मुलगा रोहित बोरसे,
मुख्याध्यापक-राजेंद्र मोरे,पर्यवेक्षक विजयकुमार शेलार, माजीसरपंच कांताताई नहार, के.सी.नहार पतसंस्थेच्या व्यवस्थापक सौ.चैताली जैन, शिक्षक सुनिल साबळ, अनिल सुर्यवंशी, जयवंत पाटील, बिपीन कायस्थ, राजु नंद, धरमसिंग सोळुंके, संजय पवार, संदिप पवार, संदेश जैन, बाळासाहेब ठाकरे, बापुसाहेब रिंढे, स्वप्नील नहार, रविंद्र डांगरे व बोलठाण तसेच नांदगाव येथील मित्र परिवार उपस्थित होते.
संतोष बोरसे यांना माध्यमिक शिक्षण विभागातील नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळेतून मागवलेल्या पुरस्कारा पैकी प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी निवड केल्या जाते त्या धर्तीवर नांदगाव तालुक्यात पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यापूर्वी त्यांना सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली यांचेकडुन जैन तीर्थंकर राष्ट्रीय पुरस्कार, व महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. ते गेल्या २४ वर्षांपासून हे बोलठाण येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अध्यापनाचे कार्य करत आहे, त्याचबरोबर त्यांना सामाजिक ,धार्मिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असल्याने या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर बोलठाण येथील दत्त मंदिर देवस्थानच्या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत.
मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नहार, उपाध्यक्ष मोहनलाल सोनी, सचिव सुरेंद्र नहाटा, संस्थेचे सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक राजेंद्र मोरे, पर्यवेक्षक विजय कुमार शेलार संस्थेचे सर्व संचालक मंडळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, बोलठाण येथील दत्त भजनी मंडळ ग्रामस्थ यांनी त्यांना मिळालेल्याने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.