संतोषीमातानगर जि.प शाळेत जिल्हयातील प्रथम अभिनव उपक्रम

0
B-N-N
समाधान घूले



संतोषीमातानगर पहूरपेठ जि. प. प्राथमिक शाळेत आज दि.१७/१/२०२० रोजी  *दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UDID कार्ड ( स्मार्ट कार्ड) ऑनलाइन प्रमाणपत्र मोफत नोंदणी कार्यक्रम*  प्रायोगिक तत्वावर  राबविण्यात आला. 

शाळेतील ४ दिव्यांग विद्यार्थ्यांची udid स्मार्ट कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली तसेच त्यांना बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालय येथील प्रक्रियेविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.


       तसेच अक्षय प्रवीण सपकाळे,  आरती संतोष  बेलदार, कृष्णा संजय खाटीक पुजा संतोष बनकर या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण  ६००० रुपये मदतनीस भत्ता व पालक प्रवास भत्ता  २३० रूपये  शाळेचे  मुख्याध्यापक पी.टी.पाटील  व मोहन मराठे विशेष शिक्षक समुह साधन केंद्र पहूर यांच्या हस्ते चेकद्वारे वाटप करण्यात आला.

  विजय सरोदे गटशिक्षणाधिकारी पं.स.जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मोहन मराठे विशेष  शिक्षक समूह साधन केंद्र पहूर, उपशिक्षक दिनेश गाडे, मनिषा राऊत यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
..
To Top